शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, विद्यार्थ्यांच्या संर्वागिण गुणवत्ता विकासाठी निरनिराळे उपक्रम राबवित असते .त्या अंतर्गत 22 जून , 2015 च्या शासन निर्णयानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू आहे .त्या अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या वर्गाच्या क्षमता व कौशल्य प्राप्त होणे अपेक्षित आहे. करीता प्रत्येक वर्गास अध्ययन निष्पत्ती ( Learning Outcomes ) निश्चित करून देण्यात आली आहे.
मा.विभागीय आयुक्त ,औरंगाबाद यांनी दिनांक 15 जुलै , 2021 रोजी विभागातील सर्व जिल्हा परिषदांच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेवून शिक्षण विभागाचा आढावा घेतला. तसेचकाही नाविन्यपुर्ण उपक्रम सुचवून त्याच्या अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन केले .तथापि Covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च , 2020 पासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या.त्यानंतर वर्ग 5 वी ते 12 वी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सुरक्षिततेचे नियम पाळून टप्प्या –टप्प्याने सुरू करण्यात आलेल्या आहेत . तसेच शाळांमधून गुणवत्ता विकासास गती देण्यासाठी विभाग स्तरावरून विभागीय गुणवत्ता कक्ष स्थापित करण्यात आला आहे. गुणवत्ता कक्षाची रचना खालील प्रमाणे करण्यात आली आहे.
अ.क्र. | अधिकाऱ्यांचे पदनाम | पद | विवरण |
१ | शिक्षण उपसंचालक , शि.उ.सं. कार्यालय,औरंगाबाद. | अध्यक्ष |
|
२ | सहाय्यक संचालक , शि.उ.सं. कार्यालय,औरंगाबाद. | सदस्य |
|
३ | शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प. जालना | सदस्य |
|
४ | सहा.शिक्षण उपनिरीक्षक ,शि.उ.सं. कार्यालय,औरंगाबाद | सदस्य |
|
५ | अधिव्याख्याता,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,औरंगाबाद. | सदस्य |
|
६ | शिक्षण विस्तार अधिकारी,जि.प.औरंगाबाद | सदस्य |
|
७ | शिक्षण विस्तार अधिकारी गेवराई ,जि.प.बीड | सदस्य |
|
८ | सहशिक्षक, जि.प.औरंगाबाद | सदस्य |
|
9 | सहशिक्षक, जि.प.औरंगाबाद | सदस्य |
|
10 | शिक्षण उपनिरीक्षक , शि.उ.सं. कार्यालय,औरंगाबाद. | सदस्य सचिव |
|